विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी दिली कृषी महोत्सवास भेट

0
9

गोंदिया, दि.19 : कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक १३ जानेवारी २०२४ पासून मोदी मैदान, गोंदिया येथे सुरू झालेल्या “गोंदिया जिल्हा कृषी व पौष्टिक तृणधान्य महोत्सवाला” दिनांक १७ जानेवारी रोजी नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मिलिंद शेंडे यांनी भेट दिली. या दरम्यान त्यांनी कृषी विभाग, आत्मा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्याद्वारे प्रदर्शित केलेल्या विविध स्टॉल्सला भेटी दिल्या व कृषी महोत्सवाच्या माध्यमातून झालेले फायदे स्टॉल्सधारक व प्रदर्शनास भेट देणाऱ्या शेतकरी बांधवांकडून जाणून घेतले. कृषी क्षेत्रात झालेले नवनविन बदल, विविध शासकीय योजनांची माहिती व आधुनिक तंत्रज्ञान सर्व शेतकरी व जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचावे व पौष्टिक तृणधान्यांचे मानवी आहारातील महत्त्व याबाबत अधिक जनजागृती व्हावी यासाठी सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील हे सुद्धा भेटी दरम्यान प्रामुख्याने उपस्थित होते.

        याप्रसंगी महोत्सवाचे मुख्य आयोजक प्रकल्प संचालक आत्मा अजित आडसुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण व महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने, कृषी अधिकारी पवन मेश्राम उपस्थित होते.