ग्रामपंचायत टेमनीच्या वतीने मृतक परिचाराच्या कुटुंबास 25 हजाराची मदत

0
7

गोंदिया-(ता.20) मागच्या चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या परिचाराचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. अशा दुःखद समयी त्याच्या कुटुंबास पंचेवीस हजारची आर्थिक मदत करीत तालुक्यातील टेमनी ग्रामपंचायत प्रशासनाने आदर्श निर्माण केला आहे.
गोबरीसिंह बरेले असे मृतक परिचाराचे नाव असून ते मागच्या चाळीस वर्षापासून ग्रामपंचायत टेमनी येथे परिचर म्हणून कार्यरत होते.अशातच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाल्याने त्याचा कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. दुःखाच्या समयी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने पंचेविश हजार रुपयाचा धनादेश मदत म्हणून त्याच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन केला. यावेळी मृतक परिचाराची पत्नी अनुसयाबाई बरेले,मुलगा मुन्ना बरेले, सरपंच योगेश (मुन्ना)पटले,उपसरपंच शैलेश डोंगरे,ग्रामसेवक देवानंद सोनवाणे, सदस्य संदीप बाणेवार, उमासिंग उईकें,शिवलाल नेवारे, रीना किरणापुरे, सुषमा पटले, मालती पटले, कीर्ती भेलावे, मालती ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत पंडेले, दुर्योधन वंजारी, ओंमकार पारधी, सामाजिक कार्यकर्ते देवानंद खोब्रागडे, दिलीप लील्हारे,देवेंद्र रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.