सायकलिंग संडे च्या टीमने श्रीरामाच्या जलोषात  सायकल चालण्याचे दिले संदेश….

0
17
गोंदिया :- उद्या 22 जानेवारी ला अयोध्या या ठिकाणी श्रीरामलला यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने अयोध्या इथेच नाही तर संपूर्ण भारतात उत्सव साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गोंदियात सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत असुन या उत्सवासाठी गोंदिया येथील सायकलींग संडे टीम सुध्दा सज्ज झाली असून सायकल चालवत. गोंदिया शहरात सायकल चालवत एकही नारा एकही नाम ‘जय श्रीराम’  ‘जय श्रीराम’  या जलोषणे करत संपूर्ण गोंदिया शहर श्री राम नावाने धुमदुमले असून उद्या होणाऱ्या जलोषाचे संदेश देत त्याच प्रमाणे आठवड्यात एक दिवस तरी सायकल चालवून पर्यावरण वाचवा व स्वतःला सायाकल चालवून निरोगी ठेवू शकता असा संदेश सायाकलिंग च्या टीमने संपूर्ण गोंदिया करांना दिले आहे. सायकलिंग संडे या टीमने एकही नारा एकही नाम ‘जय श्रीराम’ ‘जय श्रीराम’  चा नारा देत संपूर्ण शहर राम नामाने दुमदुमले आहे. या वेळी सायकलिंग मध्ये मंजु कटरे, रवि सपाटे, विजय येडे, मुंनालाल यादव, जितेंद्र खरवडे, दिपक गाडेकर, कामेश  ब्राह्मणकर, पलक कोटाडीया, दीपाली वाढई, वैशाली भांडारकर, नरेंद्र बेलगे, नवीन दहिकर, आशा तिडके, त्रवेनी उईके, एकांश रहांगडाले, आर्यन कुभलवार, अर्णव इटणकर, कनक शिल्लारे, शुभम भिमटे, दिव्या वाढई यांनी सहभाग घेतला.