गोंदिया,दि.24 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे दिनांक 25 व 26 जानेवारी 2024 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार 25 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मनिष नगर, नागपूर निवासस्थान येथून अर्जुनी मोरगाव (जि.गोंदिया) कडे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वाजता पंचायत समिती कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे आगमन. सकाळी 10.30 ते 11.30 पर्यंत पंचायत समिती अर्जुनी मोरगाव इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता अर्जुनी मोरगाव येथून चिखली कडे मोटारीने प्रयाण. दुपारी 12 वाजता चिखली येथे आगमन व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता चिखली येथून कोहमारा कडे प्रयाण. दुपारी 12.45 ते 1.15 पर्यंत कोहमारा येथे आगमन व एरिया 51 येथे राखीव. दुपारी 1.15 वाजता कोहमारा येथून घोगराघाट ता. सडक अर्जुनी कडे प्रयाण. दुपारी 1.45 वाजता घोगराघाट येथे आगमन व पुलाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता घोगराघाट येथून वडेगाव माहुली कडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता वडेगाव माहुली येथे आगमन व पुलाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3.15 वाजता वडेगाव घाट येथून खोडशिवनी कडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता खोडशिवनी येथे आगमन व नदीवरील पुलाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.15 वाजता खोडशिवनी येथून म्हसवाणी कडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वाजता म्हसवाणी येथे आगमन व नदीवरील पुलाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.15 वाजता म्हसवाणी येथून घोटी कडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वाजता घोटी घटेगाव येथे आगमन व घोटी घटेगाव मुंडीपार पुलाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.15 वाजता घोटी घटेगाव येथून शासकीय विश्रामगृह गोंदिया कडे प्रयाण. रात्री 7.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या समारंभानिमीत्त आयोजित राष्ट्रध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील.