सितेपारच्या छत्रपती विद्यालयात प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांचा सत्कार

0
18

आमगाव,दि.27ः तालुक्यातील श्री संत गाडगे महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित छत्रपती विद्यालय सितेपार येथील माध्यमिक विद्यालयात 75 वा भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा संस्था अध्यक्ष श्रीमती ममता व्हि. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.ध्वजारोहण ग्रामपंचायत सरपंच देवराव बिसेन यांच्या हस्ते गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि भगिनी,शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य गण,मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,वृंद विद्यार्थी,विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडले.त्याचप्रमाणे मार्च 2023 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, तसेच मित्र विवेक गुणवत्ता पुरस्कार जैपाल भै. ठाकूर व इयत्ता दहावीच्या किर्तीवंत गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम दशरथ चौधरी यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात आले.