४ फेब्रुवारी ला पिंपळगाव/खांबी येथे परिवर्तनशिल साहित्य संमेलन

0
10

(दिवसभर विविध कार्यक्रमाची मेजवानी)
अर्जुनी मोर. :- तालुक्यातील पिंपळगाव खांबी येथे मातोश्री रमाई आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने युगपुरुष युवा मंच पिंपळगाव खांबी च्या वतीने परिवर्तनशील साहित्य संमेलन 4 फेब्रुवारी रोज रविवारला आयोजित करण्यात आला आहे.
सिध्दार्थ बुध्द विहार समीती तथा सारीपुत्त बुध्द विहार समीती यांचे संयुक्त विद्यमाने पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्यनगरी पिंपळगाव/खांबी येथे एकदिवसीय परिवर्तनशिल साहित्य संम्मेलन तिन सत्रात होणार आहे. परिवर्तनाचा वादळ वारा या भीम गीताच्या कार्यक्रमाने सकाळी आठ वाजता या साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे त्यानंतर लगेच भव्य रोगनिदान शिबिर घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता परिसंवाद यामधे भारतिय संविधान प्रत्येक भारतियांचे सुरक्षा कवच या विषयावर तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री राजकुमार बडोले सह उदघाटक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर यांचे हस्ते, जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. तिस-या पर्वामधे रात्री आठ वाजता विद्रोही गायिका राष्ट्रीय प्रबोधनकार अंजली भारती यांचा भिमबुध्द गिताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. या परिवर्तनशिल साहित्य संमेलनात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन युगपुरुष युवा मंच पिंपळगावच्या वतीने करण्यात आले आहे.