आजही आपल्या महापुरूषांच्या आचार आणि विचाराची गरज – डॉ. निशिगंधा वाड

0
15

अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे)-जीवनात यशस्वी होण्यासाठी थोर महापुरुषांच्या आचरण आणि विचारांची गरज आहे. जसा वंशाचा दिवा मुलगा आहे तशी वंशाची ज्योत मुलगी आहे. सर्वांनी आपली जबाबदारी जपली पाहिजे. प्रफुल्ल जयकर यांचे लिहलेले इंदिरा नावाचं पुस्तक वाचण्याचा सल्ला देत माणसाने जगत असताना इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पत्नीने पत्नीवर दाखवलेला अधिकार पत्नीने अतिशय प्रेमळपणे परतून लावला पाहिजे. माणसाच्या जन्माने नाही तर जगण्याने सिद्ध झालं पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आजही थोर महापुरुषांच्या आचरण आणि विचारांची गरज आहे असे प्रतिपादन अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केले.स्थानिक सरस्वती महाविद्यालयात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (ता.०४) भव्य महिला मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.मेळाव्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील महिलांची तुफान गर्दी बघायला मिळाली. जागेआभावी बऱ्याच महिला आणि नागरिक बाहेर उभे होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आ.प्रणिती शिंदे, मध्य प्रदेशातील माजी आमदार हिना कावरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीप बनसोड ,पी.जी.कटरे, अमर वराडे, उषा शहारे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना काळे, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे, तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम धामट,माजी जि.प.अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रमोद पाऊलझगडे, पं.स.सदस्या चंद्रकलाबाई ठवरे, भाग्यश्री संयाम, नगरसेवक सर्वेश भूतडा, अतुल बनसोड, सिला उईके ई. प्रामुख्याने उपस्थिती होते.
त्या पुढे म्हणाल्या कि, सत्ताधाऱ्यांकडून राम नामाचा मतलबी गजर सुरु आहे..भगवान राम आमच्या हृदयात आहेत जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हाही गांधीजींनी हे राम हे शब्द उच्चारूनच आपला देह सोडला.
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी ही मार्गदर्शन करतांना महिलांनी आपल्या हक्क व अधिकाराची लढाई लढावी,देशात सध्या महागाई, बेरोजगारी, व महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. अशा प्रवृत्तीला त्यांची जागा दाखविण्याचे आवाहन केले.महागाई आकाशाला भिडली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून देशात राज्यात सत्ताधाऱ्यांच्या आमदार व खासदारांकडून महिलांवर अत्याचार वाढत आहेत. भर दिवसा गोळीबार गुंडगिरी माजवून सामान्यांना छळले जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पादन घेतले जाते. मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या मुलालाही आता मुलगी मिळणे कठीण झाले आहे.त्यामुळे केवळ महिलांवर अत्याचार राहिले नाहीत तर पुरुषांवरही अत्याचार या सरकारने वाढवले असल्याचे प्रतिपादन नाना पटोले यांनी केले.कार्यक्रमाच प्रास्ताविक आयोजक अनिल दहिवले यांनी, संचालन आगाशे तर आभार प्रा.नूतन अनिल दहिवले यांनी केले.