परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे:- माजी मंत्री राजकुमार बडोले

0
16

 पिंपळगाव येथे परिवर्तनशील साहित्य संमेलन थाटात
अर्जुनी मोर.दि.05- स्वयं प्रकाशित व्हा व प्रज्ञा शील करूना हे महामंत्र तथागत बुद्धांनी दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे देशात मोठे परिवर्तन घडले. आमची जिंदगानी अशीच गेली असती वाया ,आणि पदरातल्या पदरात रडत बसल्या असत्या आमच्या आया आणि बाया या कवितेतील ओळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आमच्यावर दडले आहेत. त्यांचे परिवर्तना मुळेच आम्ही माणूस म्हणून जगत आहोत. तथागताने आम्हाला धम्म दिला. आणि पंचशील दिले.तर बाबासाहेबांनी आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला.प्रत्येक माणसांनी बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांची लाट अशीच सुरू ठेवावी. कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे असे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री इंजी. राजकुमार बडोले यांनी केले.
युगपुरुष युवा मंच पिंपळगाव खांबी येथे तारीख ४ फेब्रुवारीला आयोजित परिवर्तन शील साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात आयोजित संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी मंत्री बडोले बोलत होते. समारोहाचे अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे होते. अतिथी म्हणून नितेश बोरकर, डॉ. भारत लाडे, नगरसेवक दाणेश साखरे, डॉ. अजय लांजेवार ,रत्नदीप दहिवले, दिलबरभाई रामटेके, व्यंकट खोब्रागडे, अनिल दहिवले, सुरेंद्र भैसारे ,प्रशांत शहारे, प्रभाकर दहिकर ,पोलीस पाटील चौरे मॅडम ,प्रशांत मेश्राम, हितेश डोंगरे, दीपक जनबंधू ,अश्विन डोंगरे व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एकदिवसीय तीन सत्रात चाललेल्या या परिवर्तनशील साहित्य संमेलनात परिवर्तनाचा वादळ वारा हा भीम गीताचा कार्यक्रम व रोग निदान शिबिर घेण्यात आले. दुसऱ्या सत्रात परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीयांचे सुरक्षा कवच या विषयावर विविध मान्यवरांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन घेण्यात आले. शेवटच्या सत्रात राष्ट्रीय प्रबोधनकार अंजली भारती यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला साहित्य प्रेमी व रसिकांनी एकच गर्दी केली होती या सत्रात माजी मंत्री राजकुमार बडोले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, डॉ. भारत लाडे, नगरसेवक दानेस साखरे, रत्नदीप दहिवले, सु मो भैसारे ,अनिल दहिवले व अन्य मान्यवरांनी आपल्याला परिवर्तन कसे करता येईल या विषयावर प्रबोधन केले. संचालन लोचन खोब्रागडे, सुरज उके यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी युगपुरुष युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.