” कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया ” ह्याचा सर्वत्र जागर सुरु

0
6

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळबंदा मधील विद्यार्थ्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पेहराव करुन केली स्पर्श  कुष्ठरोग  जनजागृती

गोंदिया( दि.5 फेब्रुवारी) : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.अभियाना दरम्यान जनजागृती व सर्वेक्षणावर विशेष भर देण्यात येत आहे अभियाना दरम्यान नागरिकांनी कुष्ठरुग्ण आजाराबाबत गैरसमज व भिती न ठेवता आपल्याला होणारा त्रास न लपवता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे. कुष्ठरुग्णांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी होणाचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण सभापती ईजि. यशवंत गणवीर यांनी नागरिकांना केले आहे.
कुष्ठरुग्ण हा आजार संपुर्ण उपचाराने बरा होवू शकतो. म्हणुन नागरिकांनी प्राथमिक स्तरावर जाणवणारे लक्षणे आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जावुन तपासणी करणे आवश्यक असल्याचे ह्याप्रसंगी म्हटले आहे. लवकर निदान,तत्पर उपचार केल्यास कुष्ठरुग्ण नक्कीच हमखास बरा होवु शकतो. ह्या आजारावरील औषधी सर्व सरकारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे.
स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान  पंधरवड्यात नुक्कड नाटकद्वारे जनजागृती ,कुष्ठरोगमुक्त झालेल्यांचे मनोगत,खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा,शाळेमध्ये प्रार्थनेनंतर कुष्ठरोग बाबतच्या प्रतिज्ञांचे वाचन,शाळेतील सूचना फलकावर कुष्ठरोग बाबतचे संदेश,शाळा व गावांमध्ये नुक्कड-नाटक, प्रश्नमंजुषा स्पर्धा,निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, कविता वाचन, रांगोळी स्पर्धा, कटपुतली, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य व कुष्ठरोगावरील म्हणी/घोषवाक्य स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी तसेच कुष्ठरोग दोड मॅरेथॉनचे आयोजन इत्यादी विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
पंचायत समिती गोंदिया अंतर्गत केंद्र दवणीवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खळबंदा येथील विद्यार्थी आदित्य जियालाल तुरकर याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पेहराव करुन कुष्ठरोग निवारणाचा संदेश देवुन नाविन्यपुर्ण उपक्रम करुन लोकांचे लक्ष वेधले. त्यांचे या उपक्रमात सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. सोनल कांबळे, धामणेवाडा उपकेंद्रातील आरोग्य सेविका लता भगत, शाळेचे मुख्याध्यापक किशोर गेडाम, शिक्षक मदनलाल रहांगडाले, विजय चौधरी,सदाशिव तुमसरे,शिला चव्हाण,निमवैद्यकिय कुष्ठरोग कर्मचारी रंविद्र जाधव यांनी सहकार्य केले.
जिल्ह्याचे सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.रोशन राऊत यांनी कुष्ठरोगाचे प्रमाण दर १० हजारी १ पेक्षा कमी करणे, कुष्ठरोग विकृती दर्जा २ प्रमाणे शून्य आणणे, कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रद्धा व गैरसमज दूर करणे, कुष्ठरोगाबाबतची जनजागृती ग्रामिण व शहरी भागांतील तळागाळापर्यंत पोहोचुन कुष्ठरोगमुक्त भारत हा संकल्प साध्य करणे हे या “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानाचा उद्देश असुन अभियानात “कलंक कुष्ठरोगाचा मिटवु या, सन्मानाने स्विकार करुया ” ह्याचा सर्वत्र जागर करण्यात येत असल्याचे सांगितले.
गोंदिया तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ. रोशन राऊत, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी प्रशांत खरात, कुष्ठरोग विभागाचे नंदकिशोर चकोले, भुपेंद्र भोकासे, संतोष बोरकर, रंविद्र जाधव,जगदिश पंचभाई, अशोक मुंडपीलवार, अनिल पडोले यांच्या मार्फत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.