भजन स्पर्धेत गुरुदेव मंडळ बोळुंदा प्रथम
गोंदिया, दि.14 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवात बुधवारला भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक भजन मंडळांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक गुरुदेव मंडळ बोळुंदा, द्वितीय क्रमांक चैतन्य मंडळ फुलचुर व तृतीय क्रमांक सुरसंगम मंडळ धाबेटेकडी यांनी पटकावला. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. अपर तहसीलदार विशाल सोनोने व अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय उद्धव नाईक उपस्थित होते.
गुरुदेव मंडळ, बोळुंदा, चैतन्य मंडळ, फुलचुर सुरसंगम मंडळ धाबेटेकडी, जानकीबाई आत्माराम वाढई नवरगाव, गायत्री उमेश बिसेन छोटा गोंदिया, अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव, अजय पटले आंबाटोली फुलचुर, शोभाबाई कोरे खमारी, रोहित श्रीभाते गोंदिया, खुशबू तनवाणी गोंदिया, कलाबाई बघेले फुलचुर, श्रीकृष्ण भजन मंडळ आमगाव, श्री. गुरुदेव सेवा मंडळ सीतेपार ता सडक अर्जुनी, गुरुदेव सेवा मंडळ तिगाव व गुरुदेव सेवा मंडळ खुर्शीपार आदी भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून आचार्य एम ए ठाकूर, श्रीकृष्ण चंदिवाले गुरुजी व एन.जे. निमावत गुरुजी यांनी काम केले तर भजन स्पर्धेचे समन्वयक म्हणून विनायक अंजनकर यांनी जबाबदारी सांभाळली.