वैशाली सामंत यांच्या सुमधूर गाण्यांवर प्रेक्षकांनी धरला ठेका

0
6

मराठी व हिंदी गीतांचा बहारदार कार्यक्रम

महासंस्कृती महोत्सव

        गोंदिया, दि.16 : सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान स्व. इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे आयोजित पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचा चौथा दिवस प्रसिध्द पार्श्वगायिका वैशाली सामंत यांनी मराठी व हिंदी गीतांच्या सुमधूर गायनातून गाजवला. यावेळी त्यांच्या सुमधूर गाण्यावर श्रोत्यांनी जोरदार टाळ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. वैशालीला दिलखुलास दाद देत प्रेक्षकांनी गाण्यांवर ठेका धरला. गोंदियावासीयांच्या प्रेमळ प्रतिसादाने वैशाली सामंत भारावून गेली.

          यावेळी वैशाली सामंत यांनी एैका दाजिबा… दाजिबा-दाजिबा, मुझे प्यार है तुझसे हैवा, छलका-छलका रे, कुसुमिता कुसूम ली आयी, ही गुलाबी हवा-ही गुलाबी फिजा, नावाची गोजिरी, वेळ परतीची बाई-बाई – खेळ खेळ माझा रंगु दे, खेळु झिम्मा आता-झिम्मा आता पोरी गं, काळी माती-निळं पाणी-हिरवं शिवार, राणी माझ्या मनामधी रुतशील का ?, नको गाऊ भाजीवाल्या प्रितीची गाणी आणि राणी माझ्या मनामधी रुतशील का ?, ईना मिना डिका-रमपम पोज रमपम पोज, तुला बघून माझा काळीज वाजतोय बुरुम बुरुम, इंडिया है मेरा-बोलो इंडिया-ओ है इंडिया-मेरा इंडिया-इंडिया इज माय लव्ह, अश्विनी तु ये ना-प्रिये जगु कसा तुझ्या विना मी राणी गं-तु ये ना प्रिये-तु ये साजना-तु ये ना प्रिये, रंगात रंगते-राधा ही बावरी हरिची-या सप्तसुरांच्या वाटेवरुनी-राधा ही बावरी हरिची, तु है वही मैने जिसे अपना कहा-तु होगा इस तरह ये वादा रहा, प्रिया तु अब तो आजा-मोनिका ओ माय डार्लिंग, छम-छम करता मेरा नशिलापन, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, लढून मरावं-मरुन जगावं, शारद सुंदर चंदेरी राती इत्यादी सुमधूर गीत प्रस्तुत करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.

       सोबतच कानडा वो विठ्ठल कर्नाटकु-येणे मज लावियला वेधू हे भजन,  मेरा चैन वैन सब उजडा, कजरा रे-कजरा रे- तेरे कारे कारे नैना, दमा दम मस्त कलंदर आदी गाणी सुद्धा प्रस्तुत केली. रेशमाच्या रेघांनी-लाल काळ्या धाग्यांनी, कर्नाटकी कशिदा मी काढीला-हात नगा लावु माझ्या साडीला, गोरी-गोरी मांडवाखाली या लावणीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

        यावेळी ‘बाई’ नावाची शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. यामध्ये राणी लक्ष्मीबाई सारख्या शुरवीर महिलांची कहाणी कथन केलेली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता, भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या अधिकाराचा प्रत्येकाने निवडणुकीत नक्कीच वापर करावा. मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी एक व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली.

        आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी राज्य शाननामार्फत जिल्ह्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नामवंत कलावंतांसोबतच स्थानिक कलावंतांना सुध्दा या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व कलावंतांचा जिल्हा प्रशासनाद्वारे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भैरवी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी चंद्रभान खंडाईत, न्यायाधीश एस.डी. वाघमारे, उपविभागीय अधिकारी गोंदिया पर्वणी पाटील, पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या पत्नी समृध्दी पिंगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांचेसह रसिक बंधू-भगिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अपर तहसिलदार विशाल सोनवणे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.