शिवजयंतीनिमित्त स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजन
लाखनी:शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वप्नपूर्ती फाउंडेशनच्या वतीने लाखनी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘देश विदेशात उच्च शिक्षणाच्या संधी’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्कॉलर, सोएस विद्यापीठ लंडनहुन कायद्याचे उच्चशिक्षण घेतलेले पाथ फाउंडेशनचे प्रमुख ॲड. दीपक चटप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. सदर कार्यक्रम संध्या. ५ वा. लाखनीतील श्रीराम मंगल कार्यालय, समर्थ नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुक्ता आगाशे, अतुल भांडारकर, किशोर वाघाये, संजय वनवे, अंगेश बेहलपांडे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये, सचिव सुधीर काळे, उपाध्यक्ष प्राची बेदरकर, सदस्य विशाल हटवार, अनिकेत नगरकर, लिखित पुडके यांनी केले आहे.
दीपक चटप यांच्याबद्दल:
दीपक चटक ब्रिटिश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकील आहेत. जगातील 168 देशांमधून ब्रिटनमध्ये शिकायला आलेल्या 1700 चे चेव्हनिंग स्कॉलर्समधून आंतरराष्ट्रीय संस्थांतील विशेष सामाजिक योगदानासाठी ‘चेव्हनिंग गोल्डमॅन 2023’ हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यांची तीन पुस्तके प्रकाशित असून ते काही वर्तमानपत्रात स्तंभलेखन करतात. महाराष्ट्राच्या विविध भागातील विद्यार्थ्यांना देश विदेशात शिक्षणाच्या संधी याबाबत ते मार्गदर्शन करतात.