गोंदिया-१९ फेब्रुवारी-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मनोहर चौकात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवनिर्मित 13 फूट उंच अश्वारूढ़ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला पोहोचलेले जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुकेनी ,शिवरायांना अभिवादन करून युवा पिढीला एक उत्साही संदेश दिला..
माजी पालकमंत्री डॉ.फुके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती धर्माचे नसून सर्व समाजाचे महान व्यक्तिमत्व होते. सर्वांना सोबत घेऊन आणि १२ बलुतेदारांना घेऊन त्यांनी हे साम्राज्य उभारले. त्यांचे अंगरक्षक आणि सैनिक सर्व धर्माचे होते. आपण शिवाजी महाराजांचे केवळ जयंतीदिनीच नव्हे तर वर्षभर स्मरण केले पाहिजे. हे नाव घेतल्यानेच आपल्याला उर्जेची अनुभूती येते.
या जयंतीच्या माध्यमातून आम्ही आज चांगली सुरुवात केली आहे. समाजातील आदित्य सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समाजाला अर्पण करून गोंदियाचे नाव उंचावले आहे.फुके म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना अनेक अडथळे निर्माण झाले होते, ते सर्व अडथळे दूर करून पुतळा बसविण्याचा प्रयत्न आम्ही समाजाच्या माध्यमातून केला. ही जागा अद्यापही शासनस्तरावर हस्तांतरित झालेली नाही. येत्या 6-7 दिवसांत ही जागाही आमची होईल, याची खात्री देतो.
जयंती सोहळ्यात स्मारकाचे उद्घाटन व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसराचे नामकरण करणाऱ्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समाजातील अनेकांचा श्री.फुके यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, आदित्य सावंत, गजेंद्र फुंडे, अपर तहसीलदार विशाल सोनवणे, तहसीलदार समशेर पठाण, एड राजा बढ़े, माधुरीताई नासरे, द्वारकाताई सावंत, मंजू कटरे, शीतलताई रहांगडाले, सुनीताताई माने, शीलाताई सावंत, वैशालीताई सावंत, श्री रमादे , निलाताई ढोक, सुनील केलंनका, दिपक कदम,राजेंद्र जगताप, राजू भाऊ, राजा कदम, महेंद्र बधे, अमृत इंगळे, सीमाताई बधे, सुवर्णा कदम, मीनाताई तुपकर, पुष्पा पवार, मंजूताई वाघ, आरती सावंत, शीतल इंगळे, स्नेहताई कदम, दत्ता सावंत, आकांशा पवार, अनंत जगताप, भावनाताई कदम, प्रतिक कदम, सागर कदम, अनूप माणिकपुरे, अजिंक्य इंगळे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.