गोंदिया –गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे छत्रपति शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती प्राचार्य डॉ.अंजन नायडू व उपप्राचार्य प्रोफेसर जयंत महाखोडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच पदवी शाखेतील विद्यार्थिनी कु. मिनाक्षी अम्बुले हीने युवा दिनाचे महत्त्व आपल्या भाषणात अधोरेखित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.स्नेहा जैस्वाल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.मनोज पटले, कु. अवनी मेठी , कु. रिया चतुर्वेदी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी महाविद्यालयचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.