छत्रपती शिवरायांचे विचार आपल्या हृदयात ठेवा:- आशाताई नाकाडे

0
15

अर्जुनी मोर. -मानवी जिवन जगत असताना संस्कार महत्वाचे आहे. आणी हे संस्कार केवळ संत महापुरुषांचे विचारतच आहे.जो ईतिहास विसरतो ,तो ईतिहास लिहु शकत नाही.शिवरायांनी तलवारीच्या जोरावर शत्रुंना सळो की पळो करुन विजय मिळवला.व रयतेचे राज्य निर्माण करुन स्वराज्य प्रस्थापीत केले.संत तुकडोजी महाराज यांनी खंजेरीवर भजनाच्या माध्यमातून तरुनांना जागवून स्वातंत्र्य लढ्यात मोठी क्रांती केली,कर्मयोगी गाडगे बाबांनी दिवसा गावागावात झाडु मारुन गावचेगाव स्वच्छ करुन रात्रीला किर्तनाचे माध्यमातून लोकांना जागवण्याचे महान कार्य केले, तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या व लेखनीच्या जोरावर प्रगत असा भारत उभा केला.तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचे दार उघडुन महिलांना स्वंयम प्रकाशीत केले.या महापुरुषांचे ईतिहास आपन वाचले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे काळात महिला फारच सुरक्षित होत्या.सोबतच जनता व शेतकरी सुध्दा आनंदात होते.अशा या महापुरुषांचे इतीहास आपन विसरता कामा नये. कारन जो इतिहास विसरतो तो आपले भविष्य घडवू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हृदयात ठेवून आचरणात उतरविण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आशाताई विनोद नाकाडे यांनी केले आहे.
तालुक्यातील धाबेटेकडी/आदर्श येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीचे औचित्य साधून ता.१९ विदर्भस्तरीय भव्य खंजेरी स्पर्धेच्या उदघाटना प्रसंगी विशेष अतिथी म्हणुन आशाताई नाकाडे बोलत होत्या. स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक दानेश साखरे यांचे हस्ते, जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी डाॅ. भारत लाडे, जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे, पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, संदिप कापगते, डाॅ. नाजुक कुंभरे, सरपंच संध्या आरसोडे, पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे,उपसरपंच पुष्पाबाई मानापुरे, माजी पं.स.सदस्य गोपीनाथ लंजे, ग्रामविकास अधिकारी अरुण हातझाडे, ग्रामसेवक नरेंद्र गोमासे,व अन्य मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राष्टसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांचे प्रतीमेला माल्यार्पण करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सुरवातीला सकाळी गावातील दर्शनी भागात अश्वरुढ असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याची विधीवत पुजाअर्चा करुन जयंती धुमधडाक्याने साजरी करण्यात आली.