अर्जुनी नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भेंडारकर,शहारे बिनविरोध

0
13

अर्जुनी मोर-स्थानिक नगरपंचायत विषय समिती सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली.यात बांधकाम सभापतीपदी राधेश्याम भेंडारकर,पाणीपुरवठा व स्वच्छता सभापतीपदी दीक्षा शहारे तर स्थायी समिती सदस्यपदी इंदू लांजेवार यांची बिनविरोध निवड झाली.
सतरा सदस्यीय नगरपंचायत मध्ये भाजपा ७,राष्ट्रवादी ४ आणि शिवसेना उबाठा गट १ मिळून सत्ता आहे.विरोधी पक्षाच्या भूमिकेत काँग्रेसचे ४ आणि १ अपक्ष असे संख्याबळ आहे.विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही पर्यायाने ही निवडणूक अविरोध पार पडली.नवनियुक्तांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.
यावेळी नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे,उपाध्यक्ष ललिता टेंभरे,गटनेते यशकुमार शाहारे, दानेश साखरे,नगरसेवक सर्वेश भुतडा,सागर आरेकर,अतुल बन्सोड,संजय पवार,नगरसेविका ममता भैय्या,सुषमा दामले,संध्या शहारे,सपना उपवंशी,शिला उईके,विजय कापगते, उपस्थित होते.पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरूनकुमार शाहारे,मुख्याधिकारी राजू घोडके, प्रशासकीय अधिकारी अमोल जाधव उपस्थित होते.