डव्वा येथे चक्रवर्ती राजाभोज जयंतीनिमित्त ‘पोवार ईरा 2024’ 27 फेब्रुवारी रोजी

0
11

सडक अर्जुनी – राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा द्वारा संचालित क्षत्रिय राहाभोज पोवार सांस्कृतिक पर्यटन केंद्र डव्वा सडक अर्जुनी च्या वतीने चक्रवर्ती राजाभोज जयंती समारोह निमित्त पोवार ईरा २०२४ चे आयोजन दिनांक २७ फेब्रुवारी रोजी राजाभोज नगरी, चिरचाडी रोड डव्वा येथे करण्यात आले आहे.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता राजाभोज दिंडी काढण्यात येणार आहे. १० वाजता दंडार रॅली, ११.३० वाजता क्षत्रिय राजाभोज मूर्ती पूजन, १२ वाजता पोवार समाज समारोह उद्घाटन व मार्गदर्शन, दुपारी २ वाजता १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सायंकाळी ६वाजता पोवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राजाभोज दिंडीचे उद्घाटन वरिष्ठ समाजसेवक डी. यू. रहांगडाले यांच्या हस्ते जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वर पटले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. दिंडीचे स्वागताध्यक्ष म्हणून सरपंच योगेश्वरी चौधरी उपस्थित राहणार आहेत.
पोवार समाज समारोह कार्यक्रमाचे उद्घाटन पोवार प्रगतिशील मंचचे अध्यक्ष ॲड. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते माजी खासदार तसेच वरिष्ठ समाज मार्गदर्शक खुशालजी बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी दीपप्रज्वलक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मिताराम पटले, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, ओबीसी कृती समिती अध्यक्ष बब्लुजी कटरे, मोतीलाल चौधरी, गोंदिया राजाभोज महारॅली अध्यक्ष पप्पू पटले तर प्रमुख अतिथी म्हणून विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य जितेंद्र कटरे, गोरेगांव प.स.सभापती मनोज बोपचे, उपसभापती अनिल बिसेन, यशवंत रहांगडाले, राजू पटले, विश्वनाथ रहांगडाले, जि. प. सदस्य सुधाताई रहांगडाले, छाया ताई चव्हाण, यू. टी. बिसेन, संजय कटरे, मनोज चव्हाण नागपूर, मयूर बिसेन भंडारा, प्रकाश रहांगडाले, विजय पारधी, बेरार टाइम्स संपादक खेमेंद्र कटरे, केतन तुरकर, महेंद्र बिसेन, भागचंद्र रहांगडाले, मनोज शरणागत आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात गोपालटोळी, म्हसवानी, मुरपार, पाटेकुर्रा, गोंगले, पांढरी, बोथली, दुंडा, धानोरी, मुंडीपार, रेंगेपार, सितेपार, सालाईटोला, कन्हारपायली, प्रधानटोला येथील समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष लीलेश्वर रहांगडाले, सचिव भाऊलाल चव्हाण, संयोजक श्याम गौतम, मुन्नालाल चौधरी, उपाध्यक्ष सोहन चौधरी, इंजी. मुन्ना चौधरी, सहसचिव रेकचंद पटले, योगेश पटले, कोषाध्यक्ष केतन चौधरी, भाऊराव पारधी, ताराचंद शरणागत आदींनी केले आहे.