प्रगटोत्सव दिनानिमित्त 29 फेब्रुवारी ते 05 मार्च पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
4

श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था, गोंदियाचा 50 वा प्रगटोत्सव दिन

गोंदिया : श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था, डब्लिंग कॉलनी गोंदियातर्फे संत श्री गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आयोजन 29 फेब्रुवारी ते 05 मार्च 2024 पर्यंत उत्साहाने साजरे केले जाणार आहे.

श्री संत गजानन महाराज स्मारक संस्था, गोंदिया यांचेकडून गुरुवार दि. 29/02/2024 रोजी सकाळी 7.00 वा. श्रींचा जलाभिषेक, आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. शुक्रवार दि.1/03/2024 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 7.00 वा. सुप्रसिद्ध गायक श्रीकांत मनोहर पिसे यांचेकडून ”श्री गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायण” 21 अध्यायावर आधारित संगीत कार्यक्रम सादर करण्यात येईल. शनिवार दि.02/03/2024 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक व आरती तसेच सायंकाळी 4.00 वा. श्रींची पालखी व शोभायात्रा शहरातील विविध मार्गातून काढण्यात येईल.

श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिनानिमित्त रविवार दि.3/03/2024 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक, सत्यनारायण पूजा, आरती व प्रसाद वितरण करण्यात येईल. सोमवार दि.4/03/2024 रोजी सकाळी 9.00 वा. श्रींचा अभिषेक व आरती तसेच दुपारी 4.30 वा. श्री श्यामबुवा धुमकेकर, नागपूर यांचे सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दास नवमी निमित्त बुधवार दि.5/03/2024 रोजी सकाळी 9.00 वा. रुद्रयाग व दुपारी 1.00 वा. पूर्णाहुती, दुपारी 2.00 वा. महाप्रसाद वितरित करण्यात येईल. तसेच नित्य पालखी व उपासना दर गुरुवारी व रविवारी 7.00 वा करण्यात येईल.

वरील कार्यक्रमात भाविकांनी जास्तीत जास्त संख्येत श्री संत गजानन महाराज मंदिर, डब्लिंग ग्राउंड, सिव्हिल लाईन गोंदिया येथे उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव समिती, गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.