सडक अर्जुनी:-– येथील तहसील कार्यालयालायेच तहसीलदार निलेश काळे यांच्या विरोधात कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचार्यांनी जिल्हाधिकार्याना पत्र पाठवून काळे यांची बदली करण्याची मागणी केल्याने एैन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महसुल विभागात खळबळ माजली आहे.सडक अर्जुनी तहसिल कार्यालयातील महिला कर्मचार्यांनी होत असलेल्या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल केलेल्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खरंंच विशाखा समिती प्रत्येक कार्यालयात निष्पक्ष काम करते काय यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
कर्मचा-यांनी दिलेल्या पत्रानुसार निलेश काळे यांनी ३ जुलै २०२३ रोजी तहसीलदार पदाचा प्रभार सांभाळला.तेव्हापासून तहसील कार्यालयातील कर्मचा-यांना त्रास देत आहेत.शासन परिपत्रकानुसार महिला कर्मचा-यास ६ वाजे नंतर थांबविता येत नाही.असे असतांनाही रात्री ९ ते १० वाजेपर्यंत बळजबरीने धमकावून कार्यालयात थांबण्यास बळजबरी करीत असल्याचे म्हटले आहे.सदर अधिकारी मनात येईल तसे कर्मचा-यांशी बेशिस्तपणे वागून महिला कर्मचा-यांना अपमानास्पद वागणूक देतात.सुट्टीच्या दिवशी कार्यालयात या अन्यथा कारणे दाखवा नोटीस,बिन पगारी रजा व निलबंनाची कारवाई करण्यााची धमकी देत असल्याचे म्हटले आहे.
कार्यालयीन कर्मचारी यांनी केलेल्या कार्यालयीन कामाच्या कागदपत्रावर सदर अधिकारी हे वेळीच स्वाक्षरी करीत नाही. स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करतात.त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात माहिती देण्यासह कार्यालयीन काम करण्यास अडचण होत आहे.सदर अधिकारी सर्व कार्यालयीन फाईल,पत्र बिल,माहिती ईत्यादी दस्ताऐवज आपल्याकडे दाबून ठेवून स्वाक्षरी करीत नाही.त्यातच तहसील कार्यालयात सहा कर्मचारी कार्यरत असून सर्व कर्मचा-यांकडे दोन ते तीन विभागाचा अतिरीक्त कार्यभार त्यामुळे सर्व कर्मचा-यावर कामाचा ताण आधीच आहे.वरिष्ठ कार्यालयाकडून प्रलंबित असलेल्या कामाकरीता विचारणा केल्यावर प्रलंबित काम असल्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्मचा-यावर टाकून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विनाकारण त्रास देत असल्याचे म्हटले आहे.सदर अधिकारी मानसिक त्रास देवून मनोबल खच्चीकरण करीत असल्याने अशा मनमानी कारभार करणा-या अधिका-याची तात्काळ बदली करण्यात यावी,अशी मागणी येथील कर्मचा-यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व उपविभागिय अधिकारी यांना केली आहे.तसेच सदर अधिका-याची बदली न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.