नागरिकांचे जनधन खाते ठणठण – प्रफुल्ल पटेल

0
16

हिंगणघाट : नागरिकांच्या खात्यात १५ लाख टाकण्याचे स्वप्न दाखवून सत्ता मिळविलेल्या मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात नागरिकांचे जनधन खाते ठणठण झाले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर केवळ माजी कृषी मंत्री शरद पवारच सहानुभूतीने विचार करू शकतात. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात शरद पवारांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतल्याची आठवणही माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी करून दिली.
यावेळी कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या ‘शेतकर्‍यांना हमी भाव देवून भले होणार नाही’, या वक्तव्याचा समाचार घेत मोदी सरकारजवळ शेतकर्‍यांसाठी कोणता फार्मुला आहे, हे त्यांनी सांगावे, असे म्हणत त्यांनी शासनाची चांगलीच टर उडविली. स्थानिक राष्ट्रीय महामार्गावरील बाजार समितीच्या लिलाव शेडच्या चार कोटी रुपयांच्या बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आ. रणजित कांबळे होते. मंचावर माजी मंत्री अनिल देशमुख, आ. शशीकांत शिंदे, बाजार समिती सभापती अँड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, पं.स. सभापती संजय तपासे व नंदा साबळे, न.पा. उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, वर्धा बाजार समितीचे पांडुरंग देशमुख, इंटकचे महासचिव आबताब खान, प्रशांत घवघवे, अनिल भोंगाडे, सौरभ तिमांडे, वासुदेव गौळकार, समुद्रपूर बाजार समिती सभापती हिंमत चतुर, पांडुरंग उजवणे, मधुकर डंभारे, वामन माळवे, प्रफुल्ल बाडे, अँड. रवींद्र मद्दलवार, राजेश मंगेकर, सुरेश सातोकर, बळीराम नासर, राजेश कोचर, विनोद वानखेडे, मधुसुदन हरणे, अशोक वांदिले आदी उपस्थित होते.