भाजपचे आजपासून पुण्यात राजकीय चिंतन

0
10

विशेष प्रतिनिधी
पुणे,दि.18- भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक शनिवार रविवारी पुण्यात होत असून या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर िचंतन होणार आहे. याचबरोबर मुंबई, ठाण्यासह राज्यातील प्रमुख महापालिका, िजल्हा परिषद, पंचायत समितीच्या िनवडणुकांची तयारी हा या बैठकीतील प्रमुख िवषय असणार आहे.

पुण्यातील बालगंधर्व येथे होणाऱ्या या बैठकीला मंत्री, खासदार, अामदार, पदाधिकाऱ्यांसह राज्यभरातून एक हजार प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज शनिवारी बैठकीचे उद््घाटन हाेणार अाहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रविवारी समारोपाच्या िदवशी मार्गदर्शन करतील. अलाहाबादला नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर सात िदवसांनी राज्य प्रदेश कार्यकारिणी आयोजित करणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे ही बैठक होत असून त्यानंतर सात िदवसांनी िजल्हा, तर पुढील सात िदवसांत तालुका कार्यकारिणी होईल.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महसूलमंत्रिपद सोडावे लागले होते, तर जलसंपदामंत्री िगरीश महाजन यांच्यावरही जमीन घाेटाळ्याचा अाराेप झाला अाहे. िगरीश बापट, िवनोद तावडे या मंत्र्यांच्या मागचा वादाचा ससेमिरा काही सुटत नाही. भ्रष्टाचाराबरोबरच प्रशासनावरील िढली होत चाललेली पकड हा फडणवीस सरकारसमोरील मोठा प्रश्न आहे. त्यातच भर म्हणून की काय िमत्रपक्ष िशवसेनेकडून होत असलेली बोचरी टीका भाजपसाठी डोकेदुखी ठरली आहेे. िवरोधकांपेक्षा िवरोधकाचे काम शिवसेना करत असल्याने भाजपची अवस्था ‘धरले तर चावते अाणि सोडले तर पळते’ अशी झाली आहे. या सर्व प्रश्नांची या चिंतन बैठकीवर छाया आहे.