३८,३0७ रोपट्यांची करणार लागवड -तहसिलदार डहाट

0
18

गोरेगाव : माणूस भौतिक सुविधांच्या मागे धावत असताना मुळात भूपृष्ठावर येणार्‍या नैसर्गिक आपत्तीला कारणीभूत ठरत आहे. ही बाब जागतिक पर्यावरणतज्ज्ञांच्या लक्षात आल्याने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी भूपृष्ठावर ३३टक्के वृक्षांची गरज आहे. म्हणून वृक्ष लागवड करणे आपले आद्यकर्तव्य समजून १ जुलै रोजी शासनाचे दोन कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यपूर्तीसाठी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी वृक्ष लागवड समन्वयकांच्या आढावा बैठकीत केले. गोरेगाव तालुक्यात ३८ हजार ३0७ रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट्ये त्यांनी ठेवले आहे.
तहसील कार्यालय गोरेगाव येथे आढावा बैठक तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आर.एफ.ओ. व तालुका समन्वय अधिकारी एस.एम. जाधव, पोलीस निरीक्षक सुरेश कदम उपस्थित होते. वृक्ष लागवडीसाठी नेमण्यात आलेले शासकीय अधिकारी, सामाजिक वनिकरण विभागाचे सहाय्यक लागवड अधिकारी के.एस. धुर्वे, नगर पंचायत प्रशासक एन.आर. नागपुरे, आरोग्य विभाग तालुका वैद्यकीय अधिकारी व्ही.एस.नाकाडे, डॉ.बी.बी. गवळी, गटशिक्षणाधिकारी आर.एल. मांढरे, ए.पी.एल.सी. आशिष बघेले, के.आर. मजुमदार, एन.आर.रहांगडाले, एस.जी. मोरे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण मुळे उपस्थित होते.यात वन विभाग २६ हजार झाडे, तालुका कृषी अधिकारी १२५0, नगर पंचायत २५0, आरोग्य विभाग २५५, तहसील कार्यालय ५0, औद्योगिक प्रशिक्षण संस्था ६0, एफ.डी.सी.एम. जांभळी २५0, गटशिक्षणाधिकारी ७000, कृषी उत्पन्न बाजार समिती २00, सामाजिक वनीकरण २५00, तलाठी कार्यालय ५एकूण १0५झाडे, दुय्यम निबंधक कार्यालय २७, विविध सेवा सहकारी संस्था प्रत्येकी ५, एकूण २६0 झाडे, पोलीस ठाणे १00 झाडे असे एकूण ३८ हजार ३0७ वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.