मुल्ला येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0
6

देवरी,दि.०८- तालुक्यातील मुल्ला येथे आज शुक्रवारी जागतिक महिला दिवस मोठ्आ उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुल्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना बागडे ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंच सोनू मेंढे, सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पलता बागडे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद बागडे, मुल्ला पोस्टाचे प्रतिक शिंदे, ग्राम पंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मान्यवर पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आजच्या महिला या सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित पुरुषांच्या बरोबरीने देशाच्या विकासाला हातभार लावत असल्याने समाधान व्यक्त केले. महिलांची आजची जी स्थिती आहे, ती केवळ भारतीय संविधानामुळे असल्याची भावना व्यक्त वक्त्यांनी केली. त्यामुळे महिलांनी या निमित्ताने संविधानकर्त्यांचे उपकार मानत जर संविधानाने महिलांचे संरक्षण करून संधी उपलब्ध करून दिली नसती, तर आज महिला या चार भितींआड राहिल्या असत्या. आज अनेक क्षेत्रात महिल्या या आघाडीवर दिसून येतात.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व ग्राम पंटायत सदस्य, सीआरपी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बँक सखी, लेखापाल  यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.