परसटोला तक्षशिला बुद्ध विहारात सौंदर्यीकरण कामाचे भुमिपूजन

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

 अर्जुनी मोर- तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात असलेल्या व जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त तक्षशिला बुद्ध विहार परसटोला ( अर्जुनी मोर.) येथील प्रांगणात सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच रामू कुंभरे यांचे हस्ते करण्यात आले.
गट ग्रामपंचायत परसटोला यांचे 15 व्या वित्त आयोगांतर्गत तक्षशिला बौद्ध विहार येथे पेव्हर ब्लॅक बसवून सौंदर्यीकरण करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच रामू कुंभरे, उपसरपंच नागेश्वर गेडाम, किशोर गोंडाणे, बळीराम उईके, देवेंद्र रामटेके, घनश्याम सांगोळे, तथा ग्रामपंचायत पदाधिकारी, बौद्ध समाजाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. परसटोला येथील तक्षशिला बौद्ध विहार जिल्ह्यात प्रख्यात असून या ठिकाणी दररोज बुद्ध वंदना व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून सर्व सोईयुक्त असलेले जिल्ह्यात एकमेव बुद्ध विहार असल्याची माहिती भाग्यवान डोंगरे यांनी दिली.