भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी  आज दोन अर्ज दाखल

0
20

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

    भंडारा दि. 22 : 11- भंडारा गोंदिया सार्वत्रिक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी आज दोन अर्ज दाखल करण्यात आले.  आज डॉ.सुहास अनिल फुंडे ,( अपक्ष) डॉ.आकाश  मधुकर जीभकाटे (अपक्ष ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज 24 उमेदवारांनी 42 अर्जांची उचल केली.

        नामनिर्देशनपत्रे सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त 27 मार्चपर्यंत  सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. 28 मार्च रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे.30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.