विरपुत्र अतिराज भेंडारकर यांना अभिवादन

0
1

अर्जुनी मोर.– तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथील शहिद विरपुत्र अतिराज बाबुराव भेंडारकर यांचे पाचव्या शहिद दिनानिमित्य त्यांचे खांबी येथील पुर्णाकृती पुतळा असलेल्या शहिद स्मारकावर ता.२४ मार्च रोजी पुष्प अर्पण करुन श्रदासुमणे अर्पीत करण्यात आली.
तालुक्यातील खांबी येथील शहिद राॅयफल मॅन अतिराज बाबुराव भेंडारकर हे सेनेमधे कर्तव्यावर असताना २३ मार्च २०१९ ला त्यांना विरगती प्राप्त झाली होती.त्यांची आठवण व कार्य इतरांना प्रेरणादायी ठरावे त्यांचे स्मरणार्थ खांबी येथे शहीद स्मारक तयार करुन गणवेशातील पुतळा बसविण्यात आला.आज त्यांचे पाचवे पुण्यस्मरण निमित्य अभिवादन करण्यात आले, यावेळी पंचायत समिती सदस्य संदिप कापगते, सरपंच निरुपाबाई बोरकर, उपसरपंच तुलाराम खोटेले, पोलिस पाटील नेमीचंद मेश्राम, तथा नारायण भेंडारकर, लक्ष्मण भेंडारकर, प्रा.घनश्याम भेंडारकर, माजी सरपंच प्रकाश शिवनकर, माजी उपसरपंच प्रमोद डोंगरे, कृष्णकांत खोटेले, सुदेश खोटेले, निंबराज भेंडारकर, ताराचंद भेंडारकर तथा कुटुंबातील सर्व सदस्य व ग्रामवासी प्रामुख्याने उपस्थित होते.