कोरंभी देवी येथे मतदार जागृती

0
3

भंडारा,दि.23 : आर्ट्स अँड कॉमर्स डिग्री कॉलेज पेट्रोलपंप जवाहरनगर राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत महाविद्यालयीन विशेष शिबिराचे आयोजन कोरंबी देवी भंडारा येथे करण्यात आले आहे. शिबिराचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने SVEEP कार्यक्रमांतर्गत मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा यांच्या मार्गदर्शनात मतदार जागृती अभियान या शिबिराच्या उपक्रमात राबविण्यात आले.

            या दहा दिवसीय शिबिराच्या माध्यमातून कोरंबी देवी येथील ग्रामवासियात मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी व मतदानाच्या दिवशी 100 टक्के मतदानासाठी प्रेरणा मिळावी यासाठी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी पथनाट्यच्या माध्यमातून जागृती केली. नवमतदारात व शिबिरार्थी विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यात आली. मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे मतदारांनी भाग घ्यावा, यासाठी विद्यार्थ्यांनी समाजातील घटकांना प्रेरित करावे असे आव्हान नोडल अधिकारी SVEEP कार्यक्रम भंडारा  रवींद्र सलामे यांनी केले.

           विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेच्या प्रात्यक्षिकात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत असताना EVM, Balate Unit, व  VVPAD म्हणजे काय हे कशा पद्धतीने काम करते हे समजून घेतले. मतदान प्रक्रिया निकोपने पार पाडण्यासाठी व मतदानाच्या दिवशी 100 टक्के मतदान वाढीसाठी NSS चे विद्यार्थी व गावकरी यांच्यामध्ये जागृती व्हावी याचे मार्गदर्शन प्रमुख वक्ते सहायक नोडल अधिकारी SVEEP भंडारा अरुण मरगडे, विनोद किंदले॔, सुनील सावरकर,तलाठी राकेश सोनकुसरे, राजेश ठाकरे यांनी केले.

          यावेळी कोरंबी देवी येथील प्रथम नागरिक सरपंच सौ कुसुमताई कांबळे, उपसरपंच सौ श्रद्धाताई लुटे, NSS कार्यक्रम अधिकारी प्रवीण देऊळकर, प्रा. डॉ .सी. पी. मारवाडे ,सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती टेंभेकर, प्रा. राजश्री गिरेपुंजे ,विद्यार्थी प्रतिनिधी अप्सरा किरणापुरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.