यवतमाळ, दि.3 : यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 3 एप्रिल रोजी एकून 4 उमेदवारांनी एकून 5 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे दाखल केले.
नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय उत्तमराव देशमुख, पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकून 2 अर्ज, धरम दिलीपसिंग ठाकूर, पक्ष सन्मान राजकीय पक्ष 1 अर्ज, संगिता दिनेश चव्हाण, अपक्ष 1 अर्ज, विशाल शालीकराम वाघ, गोंडवाना गणतंत्र पार्टी 1 अर्ज या उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकून 8 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले आहे.
तसेच आज 16 व्यक्तींनी 32 नामांकन अर्जाची उचल केली. याप्रमाणे नामनिर्देशन प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकून 91 व्यक्तींनी 164 अर्जाची उचल केली आहे.