प्रशासनाच्या समन्वय समितीत तोडगा नाही संघर्ष समिती निवडणूक बहिष्कारावर ठाम

0
9

– राजकीय पक्षांची दबावतंत्राची भूमिका

आमगाव:- आमगाव नगर परिषदचा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरण राज्य शासनाने निकाली काढले नसल्याने आठ गावातील नागरिकानी देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला आहे.यात तोडगा काढण्यासाठी तहसिलदार व पोलीस उपविभागीय. अधिकारी,राजकीय पक्ष पुढारी व संघर्ष समितीच्या सहभाग घेऊन समन्वय सभा घेण्यात आले.यात सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघर्ष समितीने होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराची भूमिका ठाम ठेवली आहे.
नगर परिषद आमगाव स्थापना संदर्भात राज्य शासनाच्या वतीने न्यायप्रविष्ठ प्रकरणाने आठ गावातील नागरिक शासनाच्या योजनेपासून वंचित व्हावे लागत आहे.
आमगाव नगर परिषद परिक्षेत्रातील आठ गावातील नागरिकाना केंद्र व राज्य सरकारच्या योजना मिळत नसल्याने तीव्र असंतोष निर्माण झाले आहे.मागील दहा वर्षांपासून नागरिक नगरपरिषद स्थापनेचा वाद राज्य सरकारने निकाली काढावे यासाठी अनेक आंदोलने,उपोषणे केली परंतु प्रशासनाने कोणतीच योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे नागरिकांनी राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला आहे.
सदर आठ गावातील नागरिकांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून घेतलेली बहिष्काराची भूमिकेवर समन्वयातून मार्ग निघावे यासाठी स्थानीक प्रशासनाने राजकीय पक्ष पुढारी व संघर्ष समिती सदस्य व नागरिक यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात सभा आयोजित केली होती.
आयोजीत सभेत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद मळामे, तहसिलदार डॉ .रवी होळी, नायब तहसीलदार भूजाडे, पोलीस निरीक्षक युवराज हांडे, संघर्ष समितीचे यशवंत मानकर,रवी क्ष्रीरसागर, संतोष श्रीखंडे, प्रा. व्ही.डी. मेश्राम, आनंद भावे,पींकेश शेंडे,मोरेश्वर पतले,सूनिता येरणे, राजकिय पक्ष पुढारी माजी आमदार केशव मानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचें नरेश माहेश्र्वरी, राष्ट्रिय काँग्रेस पार्टीचे संजय बहेकार, शिवसेना शिंदे गटचे सुरेंद्र नायडू व आठ गावातील प्रमुख पुढारी व नागरिक उपस्थित होते.
आयोजीत सभेत तहसिलदार डॉ.रवी होळी यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत अधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. नगर परिषद आमगाव स्थापना संदर्भात न्यायप्रविष्ठ प्रकरणाने नागरिकांना होत असलेली असुविधा लक्षात घेता स्थानिक प्रशासन कार्य करीत असल्याचे सांगितले तर मतदान वर नगर परिषद संघर्ष समिति व नागरिकांनी बहिष्कार मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. नगर परिषद स्थापनेचा विषय बाबद वरिष्ठांना कळवण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.तर मतदान निर्भयपणे व्हावे यासाठी सर्व यंत्रणा कार्य करीत आहे. असे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रमोद मळामे यांनी माहिती दिली.
यावेळी भाजप माजी आमदार केशव मानकर यांनी संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणूकीत बहिष्कार टाकला जात आहे हे बरोबर नसल्याचे सांगत नगर परिषद संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना तीन दिवस आधी ताब्यात घ्यावे व गुन्हे दाखल करा असे दबावतंत्र घालून आपले मत ठेवले,यावर तहसिलदार डॉ.होळी यांनी लोकशाही मार्गाने आपले विचार ठेवणाऱ्यांना बळजबरी करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.तर मतदान निर्भयपणे होण्यासाठी प्रशासन आपले कार्य पूर्ण करेल असे सांगितले.
यावेळी नरेश माहेश्र्वरी , जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे यांनी निवडणुकीत बहिष्कार समर्थन नाकारले तर राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चे संजय बहैकार यांनी पक्ष पदाधिकारी असल्याने निवडणुकीत बहिष्कार समर्थन नाकारले तर संघर्ष समितीच्या भूमिकेचे समर्थन केले.
यावेळी संघर्ष समितीच्या माध्यमातून रवी क्षीरसागर,यशवंत मानकर,उत्तम नंदेश्वर, संतोष श्रीखंडे यांनी नागरिकांनी घेतलेल्या भूमिकेतून सदर निर्णय हा जनतेचा असून प्रशासनाने योग्य दखल घेऊन न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यासाठी शासनाने दखल घेण्याची मागणी करीत आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी रमण डेकाटे, गुड्डू मेंढे, गुड्डू भाऊ डोये,भुमेस्वर कठाने, मुन्ना भाऊ खोब्रागडे,राजेंद्र मेंढे,दिवाकर सोनवणे,दिलीप टेबरे, मंगरु अंबुले,घनश्याम मेंढे, सूनंदा येरणें, सुनंदा उके,उमेश चतुर्वेदी,संतोष पुंडकर,रवी पाठक,राजकुमार फुंडे,दिवाकर चूटे,राम चक्रवर्ती व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.