अहमदनगर दक्षिण मध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे उभे आहेत. निलेश लंके यांनी नुकताच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला असून त्यांनी सुजय विखे यांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, निलेश लंके यांना सुजय विखे यांचे आव्हान खरच पेलवणार का हा मोठा सवाल आता उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच वर्षात सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. बारा वर्षांपासून रखडलेला उड्डाणपूल, दहा वर्षांपासून रखडलेली पाणी योजना, अनेक वर्षांपासून रखडलेला आयुष हॉस्पिटलचा प्रश्न, शहरातील बायपासचा प्रश्न, विविध रस्ते विकासाची कामे सुजय विखे पाटील यांनी केली असून या कामांचे ते यंदाच्या निवडणुकीत भांडवल करण्याच्या तयारीत आहेत.
किंबहुना याचा त्यांना फायदाच होणार आहे. यामुळे स्वतः सुजय विखे पाटील यांनी कित्येकदा जर विकासाच्या मुद्द्यावर यंदाची निवडणूक होणार असेल तर नगर दक्षिणमध्ये निवडणूक घेण्याची गरजच नसल्याचे म्हटले आहे. अर्थातच सुजय विखे पाटील हे नगर दक्षिणमधून निवडणुकीबाबत पूर्णपणे आश्वस्त आहेत. दरम्यान आता सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना एक चॅलेंज दिले आहे. त्यांनी लंकेंना एका महिनाभरात माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे, भलेही यासाठी महिनाभर वेळ घ्यावा, तसेच पाठ करून मी आत्तापर्यंत जें माझ्या भाषणांमध्ये इंग्रजी बोलतो तेवढे बोलून दाखवावे असे चॅलेंज दिले आहे. शिवाय जर निलेश लंके यांनी असे केले तर मी निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही असे यावेळी त्यांनी म्हटले आहे. यामुळे नगरच्या राजकीय वर्तुळात आता दोन्ही उमेदवारांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुजय विखे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निलेश लंके यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले आहे आणि आयटीआय केलेला आहे. दुसरीकडे सुजय विखे पाटील हे उच्चशिक्षित आहेत. ते न्यूरोसर्जन आहेत. दरम्यान सुजय विखे पाटील यांनी मी जशी इंग्लिश बोलतो तसे जर समोरच्या उमेदवाराने बोलून दाखवली तर मी उमेदवारीचा फॉर्म भरणार नाही असे म्हणून नगरच्या जनतेपुढे निलेश लंके यांचा शिक्षणाचा प्रश्नच उपस्थित केला आहे. यावरून सध्या तरी सुजय विखे पाटील हे लोकसभेच्या ग्राउंडवर जोरदार बॅटिंग करत आहेत अस दिसत आहे. यामुळे निलेश लंके यांना सुजय विखे पाटील यांचे आव्हान पेलवणार का हा मोठा प्रश्न आहे.
सुजय विखे यांच्या चॅलेंजवर काय म्हणताय लंके