निलज चेकपोस्टवर मद्यप्राशन करुन झोपलेले कर्मचारी निलंबित

0
37

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकार्‍यांनी केली कारवाई

भंडारा (Bhandara) : पवनी तालुक्यातील निलज चेकपोस्टवर (Nilaj Checkpost) सर्वेक्षण पथकातील कार्यरत दोघा कर्मचार्‍यांना निवडणूक कर्तव्यात कसूर करणे चांगलेच अंगलट आले. दोन्ही नियुक्त अध्किारी व कर्मचारी मद्यप्राशन करुन झोपलेले दिसून आले. (Election Officer) निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी निवडणूक विषयक कर्तव्यामध्ये कसूर केल्याचा ठपका ठेवत पं.स. पवनी येथील विस्तार अधिकारी एल. जे. कुंभारे व भंडारा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीक सचिन पढाळ यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

भंडारा-गोंदिया (Bhandara LokSabha) लोकसभा मतदार संघांतर्गत लोकसभा (LokSabha Elections) सार्वत्रिक निवडणुकीकरीता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा यांच्या आदेशान्वये पंचायत समिती पवनी येथील विस्तार अधिकारी एल.जे.कुंभारे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग भंडारा येथील वरिष्ठ लिपीक सचिन पढाळ, यांची पवनी तालुक्यातील निलज चेकपोस्ट या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

दि.५ एप्रिल २०२४ रोजी (Election Officer) निवडणूक निरीक्षक खर्च व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी निलज चेकपोस्ट या ठिकाणी भेट दिली. त्यावेळी तहसीलदार पवनी व पवनी पोलीस निरीक्षक हे उपस्थित असतांना विस्तार अधिकारी एल.जे.कुंभारे व वरिष्ठ लिपीक सचिन पढाळ हे त्या ठिकाणी दिसून आले नाही. पोलीस टेंटमध्ये जाऊन पाहिले असता दोन्ही नियुक्त अधिकारी व कर्मचारी झोपलेले दिसून आले. त्यांना निवडणूक निरीक्षक यांचे समोर हजर केले असता त्यांना अधिकार्‍यांशी योग्य संवाद सुद्धा करता आले नसल्याचे दिसून आल्याने ते मद्यप्राशन करुन झोपले होते. दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली असता वैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या अहवालात मद्यप्राशन केल्याचे नमूद करण्यात आले.

तसेच संबंधित कर्मचार्‍यांवर पवनी तहसीलदारांनी फौजदारी गुन्हा दाखल केला. कर्तव्यावर असतांना मद्यप्राशन करुन झोपल्याचे आढळून आल्याने निवडणूक निरीक्षक खर्च यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भंडारा (Bhandara Police यांचा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांचा वैद्यकीय अहवाल विचारात घेता निवडणूक कर्तव्यावर असतांना मद्यप्राशन करुन स्थिर सर्वेक्षण पथकाच्या चेकपोस्टवर झोपणे. निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा, उचराई व कसूर करणे संबंधित कर्मचार्‍यांचे (Election Officer) निवडणूक विषयक कामकाजात बेजाबदार वर्तन दिसून आले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी एका आदेशान्वये विस्तार अधिकारी एल.जे. कुंभारे, व वरिष्ठ लिपीक सचिन पढाळ या दोन्ही कर्मचार्‍यांवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ कलम २८ ए अन्वये निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.