नीलकमल स्मृती प्रित्यर्थ रुग्णांना फळ वाटप

0
1

नीलकमल स्मृती फॉउंडेशनचा उपक्रम
सडक अर्जुनी.-येथील नीलकमल स्मृती फॉउंडेशनच्या वतीने आयोजक आर. व्ही. मेश्राम व आयोजिका प्रज्ञा मेश्राम यांच्या कडून मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ ‘नीलकमलच्या’ जन्मदिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता.10) स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. सांकेत परशुरामकर यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे सहायक अधीक्षक वामन शिवणकर, अधिपरिचारिका सूर्यकांता पारधी, अधिपरिचारिका दिव्याणी देशभ्रतार, कक्षसेवक भोजराज कापगते, रमेश भेंडारकर, आयोजक आर. व्ही. मेश्राम, आयोजिका प्रज्ञा मेश्राम व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. सडक अर्जुनी.येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करतांना वैद्यकीय अधिकारी डॉ. परशुरामकर,आर. व्ही. मेश्राम आदी उपस्थित होते.