सडक अर्जुनी येथील संबोधी बौद्ध विहारात क्रांतिसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

0
2
सडक अर्जुनी -येथील संबोधी बौद्ध विहारात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. मेश्राम यांच्या हस्ते महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक वंदना घेण्यात आली. अभिवादन कार्यक्रमाला जागेश्वर वैद्य, प्रा. संतोष रामटेके, रजनीश मेश्राम, राहूल गणवीर, चंद्रकुमार गणवीर,पुण्याशिल कोटांगले, रंजिता मेश्राम, स्नेहा गणवीर,शिला सूर्यवंशी, पूनम खोब्रागडे,मनिषा शहारे, मंगला मेश्राम,निधी सूर्यवंशी, आदिभा सूर्यवंशी आदी उपस्थित होते.सडक अर्जुनी. येथील संबोधी बौद्ध विहारात म. फुले यांच्या जयंती दिनी उपस्थित समाजबांधव हे होते.