शाळा ही ब्रेनपॉवर वृदद्धिंगत करण्याचा मार्ग -शिक्षणाधिकारी गजभिये

0
12

संथागार येथे लिटल बुद्धा शाळेचे उदघाट्न थाटात

गोंदिया ता.11 एप्रिल :-प्राचीन काळात मस्सल पॉवरची आवस्यकता जरूर होती परंतु आधुनिक काळात ब्रेनपॉवरची नितांत गरज आहे.हा ब्रेनपॉवर वृद्धीन्गत करण्याचा मार्ग शाळेमुळे गाठता येतो.असा ठाम विश्वास गोंदिया जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी (ता.11) व्यक्त केला.
येथील बुद्धिस्ट समाज संघाच्या संथागार येथे आयोजित लिटल बुद्धा इंटरनॅशनल प्रीस्कूलचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शासन तंत्रज्ञान मंडळ औरंगाबादचे उपसंचालक उमेश नागदेवे हे होते. मंचावर गोंदिया जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर,संथागारचे संचालक प्रा. रोशन मळामे,सामाजिक कार्यकर्त्यां कल्पनाताई शेंडे, संध्याताई मेश्राम उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीचे औचित्य साधून या शाळेचा प्रारंभ करण्यात आला.
शिक्षणाधिकारी गजभिये पुढे म्हणाले की,हजारो वर्षांपासून ज्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं त्याचं समाजाने शाळा काढून शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे दाखवून दिलं. ते पुढे म्हणाले की, ज्या समाजावर अन्याय होत असेल त्यांच्यात प्रतिकार करण्याची क्षमता असली पाहिजे. जो समाज शिकला असेल त्या समाजाने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सहकार्याची भावना जोपासावी अशी विनंती त्यांनी केली.ते पुढे म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर हा एक मोठा विचार आहे. त्या विचाराला निरंतर प्रवाहीत ठेवण्यासाठी अश्या शाळांची नितांत गरज आहे.भविष्यात ही शाळा आदर्श ठरली पाहिजे, अशी मनिषा त्यांनी बोलून दाखविली.या प्रसंगी श्री गणवीर यांनीही मार्गदर्शन करून संथागारच्या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली.
प्रा.मळामे म्हणाले की, महात्मा फुल्यांच्या जयंती निमित्त संथागाराने शैक्षणिक क्षेत्रात पहिल्यांदाच हे पाऊल टाकलं आहे. श्री नागदेवे म्हणाले की, समता, स्वातंत्र्य,न्याय आणि बंधुभावाची आमची विचारसरणी आहे, विषमतावादाला मुळीच थारा नाही. कारण हेच आंबेडकरवादाचे मूळ कारण आहे.
या प्रसंगी दाणवीर लक्षमीनारायण मेश्राम यांचं पुष्पगूच्छ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शिक्षणाधिकारी गजभिये यांनी उपस्थितांकडून मतदार प्रतिज्ञा वदवून घेतली.कार्यक्रमाचे संचालन वैशाली खोब्रागडे यांनी तर आभार प्रा.दर्शना वासनिक यांनी मानले.