डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्त अल्पोपहार वितरण

0
10

=रात्रौ १२ वाजता केक कापुन जयंती समारोहाला सुरवात =
अर्जुनी मोर. :– विश्वरत्न माहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अर्जुनी मोर. शहरात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. एकता मंच व बौध्द समाज अर्जुनी मोर. च्या वतीने जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम रात्रौ १२ वाजता जुन्या बसस्थानक चौकात केक कापुन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरवात करण्यात आली. यावेळी हजारो बौध्द उपासक, उपासीकांनी बाबासाहेबांचा एकच जयघोष करण्यात आला. १४ एफ्रिल ला सकाळी दहा वाजता याच चौकात भगवान बुद्ध, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बिरसा मुंडा, व अन्य महापुरुषांचे प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने व बुध्दवंदनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी हजारोंना अल्पोपहाराचे व मठ्ठ्याचे वितरण करण्यात आली.कार्यक्रमाला नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे, नगरसेवक दानेश साखरे, डाॅ. भारत लाडे, उपविभागीय अभियंता अमित शहारे, प्रशांत लाडे, नगरसेवक एसकुमार शहारे, राधेश्याम भेंडारकर, डाॅ. कुणाल मेश्राम, ईंजी. मेश्राम, संगमकुमार नंदागवळी,पुनाराम जगझापे,जगदीश मेश्राम, विलास शहारे,दिवाकर शहारे, भवेश शहारे, गजानन रामटेके, अनिल दहीवले, गोंडाणे सर, अमण टेल्लर, तथा एकता मंच व बौध्द समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मठ्ठा व अल्पोपहाराचा हजारो नागरीकांनी लाभ घेतला.