ग्रामपंचायत मोहाडी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी

0
10

गोरेगाव -दि.१४/४-तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक १४ एप्रिल ला विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी उपसरपंच मोहनलाल पटले, ग्रांम पंचायत सदस्य पुस्तकलाबाई पटले,प्रभाताई पंधरे, तंन्टामुक्ती गांव समिती अध्यक्ष लिखीराम बघेले, पोलिस पाटील राजेश येळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सर, माजी उपसरपंच श्रीराम पारधी, सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले, शिवराम मोहनकार,भुराजी भोयर सुखराम चौधरी, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून आपले जीवनमान उंचावे प्रत्येक पालकांनी पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असे यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार संघनक चालक भुवन राऊत यांनी केले.