जिल्हा परिषदेत मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

0
7

गोंंदिया,दि.2५- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे दृष्टीने एक दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळेचे आयोजन स्व.वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आले होते.
जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांचा समावेश असतो. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेचे स्थानिक स्तरावर महत्वाचे स्थान आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या विविध योजना व कार्यक्रमाचे महत्त्वाचे नियोजन करण्यात येतात. अशा प्रसंगी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दमछाक होऊन जाते. जिल्हा परिषदेत 10 ,20 व 30 वर्षापासून काम करीत असलेले कर्मचारी सेवा बजवताना दिसतात. सद्यस्थितीत जीवनशैली बदलामुळे कर्मचारी व अधिकारी यांना रक्तदाब, मधुमेह ,लठ्ठपणा,थायरॉईड असे विविध आजार बळावलेले असतात.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्यबाबत काळजी घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दुरोगामी कल्पक निर्णय अंति एक दिवसीय मानसिक आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेला मानसिक आरोग्य तज्ञ डॉ.लोकेश चिर्वतकर, मानसोपचार डॉ.अजित वागदे यांच्या टीमने सहभाग घेतला.
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कामे करताना मानसिक आजार, ताणतणाव , वर्तणुक उपचार, समुपदेशन, चिंतारोग, निद्रानाश, चिडचिडेपणा, दारू- तंबाखू-गुटखा-खर्रा यांचे व्यसन,डोळ्यांचे विकार,सांधेदुखी,कमरेचे आजार अशा विविध बाबीवर मार्गदर्शन करण्यात आले. टेलीमानस 14416 ह्या निशुल्क टोल फ्री क्रमांकावर 24 तास आपल्याला उदासी,चिंता,घबराहट,मानसिक तणाव, आत्मह्त्येचे विचार,राग, चिडचिड, ईत्यादी समस्या बद्दल सल्ला/समुपदेशन मिळत असल्याचे सांगितले.तसेच कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय सुचविले. मानसोपचार डॉ.अजित वागदे यांनी दैनंदिन कामे करताना मेडिटेशन नियमित करण्याबाबत त्यांचे फायदे बाबत प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामीण भागातील जनतेविषयी महत्त्वाचे कामाचे नियोजन करण्यात येते ते दैनंदिन कामे करताना त्यांच्या वयाचा अनुभवाचा विचार करता त्यांना विविध दडपणाखाली किंवा मानसिक आरोग्य समस्या जाणवत असतात. कर्मचाऱ्यांनी प्रलंबित फाईलचा योग्य निपटारा आरोग्यबाबत जागृत राहीले पाहिजे, नियमित योग किंवा व्यायाम, संतुलित आहार घेतल्यास त्यांची प्रकृती उत्तम व निरोगी राहू शकते. कुठलेही व्यसन न बाळगता जीवनशैली बदलून मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी असे मानसिक आरोग्य कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.भविष्यात कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक कार्यशाळा व योग शिबीर यांचे आयोजन करण्यात येतील.

  • एम. मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी