खरीप हंगामातील धानाची त्वरीत उचल करुन रब्बी हंगामातील धान खऱेदीचा मार्ग मोकळा करा

0
20
माजी पालकमंत्री इंजि.राजकुमार बडोले यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

गोंदिया,दि.२९– जिल्ह्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची शेती करण्यात येते. खरीप हंगामातील खरेदी केलेले धान अद्याप धान खरेदी केंद्रावर असून यामुळे रब्बी हंगामातील धान खरेदी रखडण्याची शक्यता आहे. कारण जुने धान उचल केल्याविना नवीन धान खरेदी सुरु करता येणार नाही. म्हणून खरीप हंगामातील धानाची उचल करून रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा करण्यात यावे.याकरिता माजी पालकमंत्री व माजी सामाजिक न्याय मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज(दि.२९) जिल्हाधिकारी यांची भेट घेत समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, सडक अर्जुनी पंचायत समितीचे उपसभापती शालिंदर कापगते, भाजप किसान आघाडी जिल्हा महामंत्री अशोक हरीणखेडे,नरेश चौधरी,देवलाल पटले उपस्थित होते.