आरोग्य विषयक उत्तम कामे केलेल्या कर्मचार्यांचा सहाय्यक संचालक डॉ.गवई यांच्या हस्ते सत्कार

0
7

गोरेगाव(दि.30 एप्रिल)- नागपूर विभागाचे सहाय्यक संचालक(मेडीकल) डाॅ.गवई यांनी गोंदिया जिल्ह्यात भेट देवुन आरोग्य विषयक कामाचा आढावा घेतला. सर्वात प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांची भेट घेवुन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील दालनात जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक व कार्यक्रम समन्वयक यांची सभा घेवुन राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यात माता व बाल मृत्यु होवु न देता सर्व आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
डॉ.गवई यांनी गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे भेट देवुन आरोग्य संस्थेव्दारे देण्यात येणार्या आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली.त्यात त्यांनी औषधी भांडार,लसीकरण कक्ष,शितसाखळी गृह व त्यातील उपकरण, प्रसुती गृह, शल्यचिकीत्सा गृह , वॉर्ड चे निरीक्षण केले. दुपारी गोरेगाव तालुक्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांचा आरोग्य संस्था आढावा बैठकिस उपस्थित राहुन गोरेगाव तालुक्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेतला त्यावेळेस गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद चव्हाण उपस्थित होते. आढावा सभेत पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तसेच उपकेंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका उपस्थित होते.आढावा सभेदरम्यान सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जसे माता व बाल संगोपन,हिवपात, क्षयरोग, कुष्ठरोग, सिकलसेल, हत्तीपाय रोग,अँनिमिया मुक्त भारत अभियान, प्रसुती, नियमित लसीकरण, कुपोषण, नवसंजीवनी योजना,साथरोग,प्रधानमंत्री मातृवंदन योजना,जननी सुरक्षा योजना,प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियान,जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम,बाल सुरक्षा कार्यक्रम,ई.विविध बाबींचा आढावा घेवुन मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या.
आढावा भेटीत डॉ.गवई यांचे हस्ते तालुक्यात आरोग्य विषयक उत्तम कामे केलेल्या कर्मचार्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. मोहगाव येथील एस.टी.भगत व पुष्पा खोब्रागडे बोळुंदा येथील समुदाय आरोग्य अधिकारी खुशबु ठाकुर व बबिता रहांगडाले कवलेवाडा येथिल सुनिता रहांगडाले व माधुरी धकिते चिचगाव येथील वनिता वाटकर हिरापुर येथील समुदाय आरोग्य अधिकारी विद्या रहांगडाले व प्रेमलता बिसेन कुर्हाडी येथील आय.डी.पटले यांचा यावेळी पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.
डॉ.गवई यांनी आपल्या भेटी मध्ये चांगल्या राखराखाव करीता वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचा चमू वर दिली जात असलेल्या आरोग्य सेवेवर आंनद व्यक्त केला.     भेटी दरम्यान त्यांचे सोबत जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत ,जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे, वैद्यकिय अधिक्षक डॉ.पी.के.पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण उपस्थित होते.