टू व्हीलरने अचानक का घेतला पेट?

0
10

वाशिम(Washim): शहरातील पोस्ट ऑफिस चौक ते सिव्हील लाईन (Civil Line) परिसरात जाणाऱ्या मार्गावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. पेट घेतलेली दुचाकी MH 37 X 9060 या क्रमांकाची असून आगीत ती पूर्णतः जळून खाक(burn up) झाली आहे. घटना स्थळाजवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस महादेव वानखेडे यांनी अग्निशमन दलाला(fire brigade) संपर्क साधून घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्काळ दखल घेत घटना स्थळ गाठले. अग्नीशमन दलाचे लिडिंग फायरमन साईनाथ सुरोषे तसेच फायरमन सोनू डोंगरे या जवानांनी अथक परिश्रम घेऊन ही आग वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इतरत्र कुठली हानी झाली नाही.