महाराष्ट्र दिनी तिरोडा येथे मुस्लीम समाजाचे सामुहिक विवाह सोहळा संपन्न

0
5

तिरोडा:- आधुनिक युगात विवाह करण्याकरिता मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असून दोन्ही पक्षांना आर्थिक बोज सहन करावा लागतो याचा मार्ग म्हणून सामुहिक विवाह पद्धती अवलंबली जात असून आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबाचे व्यक्ती सामुहिक विवाहात पुढाकार घेत असतात. तिरोडा शहरात आतापर्यंत मुस्लीम जमातीचे सामुहिक विवाह संपन्न झाले नसून तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी सामुहिक विवाहाला चालना देत मुस्लीम बांधवांचे सामुहिक विवाह करण्याचे नियोजन केले असून यामध्ये तीन जोडप्यांचे विवाह संपन्न झाले यावेळी आमदार विजय रहांगडाले, जी.प.सदस्य पवन पटले, एड.माधुरी रहांगडाले, रजनी सोयाम, प.स.सभापती कुंता पटले, उपसभापती हुपराज जमाईवार, कृउबास सभापती जितेंद्र रहांगडाले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, मा.नगराध्यक्ष अजय गौर, नरेश कुंभारे,मा.न.प.सदस्य जिब्राइल खा पठान, राजेश गुनेरीया, सलीम जवेरी,संजय बैस,आनंद बैस, मध्यवर्ती बँकेचे सचिव डॉ.अविनाश जायस्वाल, जामा मस्जिद सदर सलामभाई शेख, सलीम घाणीवाला, वसिम शेख,कलामभाई शेख, जुनेद जवेरी, तबरेज मन्सुरी, साबीर खान, सचिव सलाम शेख, अरसद पठान,साजिद मन्सुरी, राशीद सौदागर, साजिद गगन, असलम पठान, मौहसीम पठान,ल सादिक शेख, रिजवान हन्फी व नगरातील सर्व मुस्लीम बांधव उपस्थित होते.