जि.प.प्राथ.शाळा आणि ग्रा.पं.खांबी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

0
2

अर्जुनी मोरगाव,दि.२- महिन्यातील पहिली तारीख १ मे जगभरात कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस’ म्हणजेच ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी अखंड महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यामुळे आजचा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनुषंगाने अर्जुनी मोरगांव तालुक्यातील ग्रा.प.आणि जि.प.प्राथ शाळा खांबी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्त ग्रामपंचायत कार्यालय खांबी येथील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच निरुपाताई बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.जि.प.प्राथ शाळा खांबी येथील ध्वजाचे ध्वजारोहण नेमीचंदजी मेश्राम पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.प.उपसरपंच तुलाराम खोटेले, ग्रा.पं.सदस्य रूतन लोणारे, शुभम बहेकार, मिनाक्षी मुनेश्वर, ममता मेश्राम, प्रियंका रामटेके, रोजगार सेवक लिलाधर राऊत ग्रा.पं.संगणक चालक योगेश लोणारे, विश्वरत्न रामटेके जि.प शाळेचे मुख्याध्यापक नागपूरे सर,शिक्षक बावणे सर, उके सर, त्याचबरोबर अंगणवाडी सेविका दहिवले, भेंडारकर मॅडम आणि शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी व गावातील नागरीक आदी उपस्थित होते.