Home विदर्भ कोट्यवधीचा खर्च झालेल्या जि.प.चे वातानुकूलीत सभागृह सोडून,प्रशिक्षण खासगी सभागृहात ?

कोट्यवधीचा खर्च झालेल्या जि.प.चे वातानुकूलीत सभागृह सोडून,प्रशिक्षण खासगी सभागृहात ?

0
15

गोंदिया,दि.०२ मेःज्या जिल्हा परिषदेच्या सभागृह पुर्नबांधणवीर सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करुन वातानुकूलीत सभागृह तयार करण्यात आले.त्या सभागृहात इतर सर्व कार्यक्रम प्रशिक्षण होत असतानाच मात्र आज 2 मे रोजी जिल्हा परिषदेच्यावतीने एका खासगी सभागृहात कर्मचारी वर्गाकरीता सेवाविषयक कामकाजासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या नावावरील कार्यक्रमामुळे अधिकार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.त्यातच या भीषण गर्मीत कर्मचारी त्रासून गेल्याचेही वृत्त हाती आले असून एका कर्मचार्याला तर भोवळ येऊन त्याच्या डोक्याला मार लागल्याने रुग्णालयात सुध्दा दाखल करावे लागले आहे.

सविस्तर असे की आज २ मे रोजी गोंदिया जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गाकरीता सेवाविषयक कामकाजासंदर्भात प्रशिक्षण व आनलाईन परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते.ही आनलाईन परिक्षा सुध्दा कर्मचारी यांच्या खासगी व्यक्तीगत मोबाईलवरच घेण्यात आली.त्याकरीता संंगणक संस्थेची गरजच नव्हती.तरीही जिल्हा परिषदेचे कोट्यवधी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या वातानुकूलीत सभागृहात ही परीक्षा न घेता खासगी सभागृहाची गरज का व कुणी पाडली याचा अभ्यास आत्ता पदाधिकारी यांना करावे लागणार आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेला गेल्या काही महिन्यापुर्वी नव्याने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एम.मुरुगनंथम हे रुजू झाले आहेत.त्यांच्या कामकाजाची प्रकिया बघून चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळखही शिक्षक भरतीप्रकियेत समोर आली होती.परंतु ज्या जिल्हा परिषदेच्या सभागृहाच्या पुर्नबांधणवीर सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्च करुन वातानुकूलीत सभागृह तयार करण्यात आले.त्या सभागृहात इतर सर्व कार्यक्रम प्रशिक्षण होत असताना त्या सभागृहाला  मात्र आजच्या प्रशिक्षण व आनलाईन परिक्षेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डावलल्याने त्यांच्या या भूमिकेवर सुध्दा आत्ता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.स्वमालकीचे सभागृह असतांना खासगी सभागृह घेऊन त्याठिकाणी शासकीय निधी खर्च करण्याचे प्रयोजन काय असेही बोलले जाऊ लागले आहे. जिल्हा परिषदेच्या निधीला खर्च करण्याकरीता शहरातील एका खासगी सभागृहात आज २ मे रोजी जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गाकरीता सेवाविषयक कामकाजासंदर्भात प्रशिक्षण व परिक्षा घेण्यात आली.

त्या प्रशिक्षण व परिक्षेकरीता त्या खासगी सभागृहाला नक्कीच आर्थिक लाभ जिल्हा परिषदेच्यावतीने होणार आहे.मात्र स्वतःचे सुसज्ज वातानुकूल सभागृह असतांना खासगी सभागृहाची गरज मुख्य कार्यकारी अधिकारी व सामान्य प्रशासन विभाग प्रमुखाच्या डोक्यात घालून जिल्हा परिषदेचा निधी वाया घालवण्याचा सल्ला देणारे कोण असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे त्या खासगी सभागृहातही मोबाईलवरच कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावयाचे होते.त्याकरीता आज जिल्ह्यातील आठही पंचायत समिती मधील कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते.यामध्ये सुमारे १५० ते २०० कर्मचार्यांचा सहभाग होता.सकाळी ९.३० वाजे सुरु झालेले हे प्रशिक्षण सायकांळी ७ वाजेपर्यंत चाललल्याचे वृत्त असून या दरम्यानच एका कर्मचार्र्याचा भोवळ आल्याने तो खाली पडला. व त्याच्या डोक्याला मार लागून रक्त निघाल्याची माहिती समोर आली आहे.सदर जखमी कर्मचार्यास लगेचच त्याठिकाणी असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी एवढ्या भीषण गर्मीच्या काळात जिल्हा परिषदेचा वातानुकूल सभागृह सोडून इतर सभागृहात हे प्रशिक्षण घेण्याची गरजच का भासली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून अनेक कर्मचारी वर्गाने मात्र प्रशासकीय सेवेच्या नावावर भीषण गर्मीमध्ये त्रास देण्याचाच प्रकार असल्याची बोलकी प्रतिक्रिया ज्या खासगी सभागृहात झाले,त्यासमोर व्यक्त करतांना एैकावयास मिळाल्या.