अस्वलाच्या हल्ल्यात पसरटोला येथील इसम गंभीर जखमी

0
14

अर्जुनी मोर.,दि.०२- तालुक्यातील पोखरडोंगरी राघोबा देवस्थान येथे पुजा करण्यासाठी गेलेल्या ईसमावर दबा धरुन बसलेल्या अस्वलाने हल्ला केल्याने  इसम गंभीर जखमी झाल्याची घटना आज ता.2 मे रोजी सायं.पाच वाजेच्या सुमारास परसटोला ( केशोरी) येथे घडली. गंभीर जखमी इसमाचे नाव अचीत अनील रामटेके (वय 37 रा.परसटोला) आहे.
अचित अनील रामटेके हे आज ता.2 मे रोजी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान गावाजवळील पोखरडोंगरी ( राघोबा) देवस्थानात पुजाअर्चा करण्यासाठी गेले होते.पुजापाठ करुन पहाडीवरुन खाली उतरत असताना दबा धरुन बसलेल्या अस्वलाने अचीत रामटेकेवर हल्ला करुन जखमी केले.अस्वलाच्या हल्ल्यातुन कशीतरी सुटका करुन आपला जीव वाचवून पहाडी खाली ठेवलेल्या आपल्या दुचाकीजवळ येऊन रक्तबंबाळ अवस्थेत गावाशेजारी पोहचले. गावातील नागरीकांना व घरच्या मंडळींना माहीती मिळताच जखमीला प्राथमीक आरोग्य केंद्र केशोरीला नेण्यात आले.तिथे डाॅ. दिपक कटरे,डाॅ.पारधी यांनी प्राथमीक उपचार करुन ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर येथे हलविले.तिथूनही जखमीला लगेच शासकीय रुग्णालय गोंदिया येथे हलवण्यात आले. या घटनेची माहीती वनविभागाला देण्यात आली.