जिल्हाधिकारी कार्यालयात तात्‍पुरते निवारा केंद्र एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण

0
14
वाशिम,दि.२ मे -राज्‍य आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त पोर्टेबल टेंटचे (तात्‍पुरता निवारा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रात्यक्षिक व प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आज २ मे रोजी घेण्यात आले.
हे प्रशिक्षण निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्‍हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पुरूषोत्तम ठोंबरे,जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी शाहू भगत, मंगरुळपीर नायब तहसीलदार निरंजन सातंगे, कारंजा नायब तहसीलदार अनिल वाडेकर, मानोरा नायब तहसीलदार मधुकर अस्टूरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. मनवर, वाशिम अग्निशमन अधिकारी अक्षय तिरपुडे यांचेसह सर्व तहसील कार्यालय, पोलीस विभाग, आरोग्य विभाग अग्निशमन विभाग, गृह रक्षक दल,तलाठी, बाकलिवाल विद्यालय येथील एन सी सी कॅडेट ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षणांतर्गत अजितकुमार पांडे, श्री.लाडे (पुरवठादार यांचे प्रतिनिधी) यांनी राज्य शासनाकडून आपत्कालीन परिस्थितीत वापराकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झालेले पोर्टेबल टेंट (तात्‍पुरता निवारा केंद्र) कशाप्रकारे तयार करावेत, याचा वापर कसा करावा, ट्रान्सपोर्ट कसा करावा, त्याचबरोबर त्यासाठी प्रिकॉशनरी उपाय कोणते आवश्यक आहेत, या तंबूची साठवणूक व देखभाल कशी करावी ई. विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदरील टेंट वजनाने हलके असल्यामुळे एका जागेवरून दुस-या जागेवर उचलुन नेण्यास सोईस्कर आहेत. तसेच अगदी १० ते १५ मिनीटात हे टेंट उभारले जातात. शिवाय हे टेंट वाटर प्रुफ आहेत. उक्‍त साहित्‍यांचा आपत्‍कालीन परिस्थितीत उपयोग होणार आहे.
राज्य आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, मंत्रालय मुंबई यांचे कडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास चार टेन्ट व ४ रेस्‍क्यु शिट प्राप्‍त झाले असुन शिटचा उपयोग आगीमध्‍ये भाजलेल्‍या व्‍यक्‍तींना सुरक्षित स्‍थळी हलवीणे साठी होणार आहे.प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विनोद मारवाडी, गजानन उगले, मारोती खंडारे, ठाकरे ,सरोदे, शिंदे, कांबळे, खिराडे,तोकिर बेनीवाले, मुकिंदा कांबळे, क्रिश बंगारे व इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.