सिंदेवाही: तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील पेटगाव-खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल )येथील ४ मे २०२४ ला सकाळी अंदाजे ८:३० वाजता तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या सौ. दीपा दिलीप गेडाम (३५) वर्षीय महिलेला दबा धरून बसलेल्या वाघाने ठार केले.
सदर घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिस ठाणेदार तुषार चव्हाण आणि त्यांची चमु, वनविभाग मौक्यावर तात्काळ पोहचून पंचनामा व इतर प्रक्रिया पार पाडली.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिवनी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, क्षेत्र सहायक प्रधान शिवनी, वन रक्षक मडावी, कोवे, शेख, भारत मडावी, सवसाकडे इत्यादी कर्मचारी वन मजूर व पिआरटी सदस्य हजर होते.