तुमसरच्या दोन क्रिकेट बुकींना अटक

0
6

गोंदिया: आयपीएल क्रिकेट सामन्यांदरम्यान नागरिकांकडून ऑनलाईन सट्टा घेणार्‍या दोघांना तिरोडा पोलिसांनी मुंडीकोटा येथून अटक केली. त्यांच्याकडून 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरु असून जिल्ह्यातही प्रत्येक सामन्यावर ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावला जात आहे. त्यासाठी शेजारील राज्यासह जिल्ह्यातील सट्टेबाजांनी ग्रामीण भागातही जाळे विणले आहे. तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील डॉ. आंबेडकर चौकात दोन व्यक्ती ऑनलाईन क्रिकेट सट्टा खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस हवालदार इंद्रजित बिसेन यांनी आपल्या सहकार्‍यांसह छापामार कारवाई करीत प्रशांत गभणे (23, रा.तुमसर) व विरेंद्र कठाणे (34 रा.तुमसर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 5 मोबाईल व 3 हजार 900 रुपये असा 45 हजार 905 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास तिरोडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार बांते करीत आहेत.