हिवताप विभागाने केला नवनियुक्त कर्मचार्यांचा सत्कार

0
8

गोंदिया,दि.०७ः- जिल्हा हिवताप विभागामार्फत आरोग्य सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध पदे मंजुर आहेत.त्यात साधारणपणे आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरिक्षक,आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ई.
जिल्ह्यात सर्व शहरी व बिगर आदीवासी भागातील आरोग्य संस्थेत राज्य स्तरावरील हिवताप विभागामार्फत पदे भरुन आरोग्य सेवा बहाल केली जाते.
गेल्या काही वर्षापासुन जिल्ह्यातील राज्यस्तरावरील आरोग्य संस्थेची हिवताप विभागाची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे पदे रिक्त होते.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मार्फत हिवतापा संबधी रक्त नमुने तपासली जातात.तसेच सद्य स्थितीत आरोग्य संस्थेतील प्रयोगशाळेचे विविध तपासणी चाचणी केल्या जात आहे.
मागील महिन्यात राज्यस्तरावरील हिवताप विभागाची 12 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदे राज्यस्तरावरुन भरण्यात आली.दि. 2 मे रोजी जिल्हास्तरिय मासिक आढावा सभा जिल्हा हिवताप अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी गोंदिया येथील कार्यालयात आयोजित केली होती. त्यात जिल्ह्यातील आरोग्य पर्यवेक्षक, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालतील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक उपस्थित होते. सदर मासिक सभेच्या प्रसंगी राज्यस्तरावरील हिवताप विभागाची नवनियुक्त 13 प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व ईतर संवर्ग 5 यांचेसह 18 कर्मचार्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांचे हस्ते सर्व कर्मचारी यांचे स्वागत करुन मनोबल वाढविण्यात आले.सर्व कर्मचारी वर्गाने आपले कर्तव्याची जाण ठेवुन लोकांना गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचे याप्रसंगी निर्देश त्यांनी दिले.
यावेळी चंद्रकिशोर ठाकरे,सीमा दमाहे,अस्मिता हुमणे,कोमल महादुले,पवन शितोडे,डिलेश्वरी डहारे,श्रुती लिल्हारे,कीर्ती नागोसे,अश्विनी चौधरी,भारती मडावी,शुभांगी बावणे,आरती झलके,अमोल कुमरे,रेशीम रुखमोडे,ईंद्रकुमार पालीवाल,नम्रता खडके व श्रुती उप्पलवार या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदकिशोर भालेराव तर आभार प्रदर्शन विजय बिसेन यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रभाकर मुनेश्वर, आशिषकुमार बल्ले, पंकज गजभिये व वर्षा भावे यांनी सहकार्य केले.