नियमानुसार निवडणूक कामाचा मोबदला द्या महासंघाचे निवेदन

0
14

गोंदिया,दि.०७ः-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक )नें जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी प्रजित नायर व उप जिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन सादर करून दि.19एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या कामात असलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दोन दिवसाच्या कामाचा मोबदला केवळ ₹.350 देण्याचे प्रयत्न केल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने ही रक्कम घेण्याचे नाकारले व नियमानुसार व शासन निर्णया प्रमाणे ₹.700 अदा करने बाबत राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी दि.19 एप्रिललाच ही बाब निवडणूक अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली. याचभंडारा -गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना ₹.700 देण्यात आले पण गोंदिया जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना ₹.350 कोणत्या आधारावार देण्यात येत आहेत? अशा प्रश्न उपस्थित केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी काहीच कार्यवाही न केल्याने दि.6 मे ला महासंघाचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व उपजिल्हधिकारी यांची भेट घेवून हा प्रश्न उपस्थित केल्यावर त्वरित कार्यवाही करून नियमानुसार मोबदला देण्याचे मान्य केले दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन करनार ही सूचना दिली.या शिष्टमंडळात मिलिंद गणवीर, देवेंद्र मेश्राम, विनोद शहारे, सुनील लिल्हारे, मुकेश बिसेन, मुरलीधर पटले, रामेश्वर उके यांचा शमावेश होता.