स्थलांतरित मजूरांनो बाहेर गावी कमविण्यासाठी जाताय….

0
12

जाण्याअगोदर आरोग्य कर्मचारी कडुन हिवतापविरोधी औषधीचा डोज घेतलाय का….
येता कणकण तापाची,करा तपासणी रक्ताची
गोंदिया- जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याला व गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. दरवर्षी जिल्ह्यातील मजूर हे तेंदू पत्ता, पत्ता सीजन, बास कटाई, बांधकाम, रस्ता कामे व इतर विविध कामानिमित्त स्थलांतरित करीत असतात. परंतु तिथे गेल्याने आपल्या आरोग्याची काळजी न करता दिवस रात्री कामे करुन उघड्यावरती झोपत असतात. गोंदिया लागून असलेल्या सीमा भागात जंगलव्याप्त भाग असल्याने परतीच्या वेळी येताना आजारी किंवा हिवताप संसर्ग घेऊन येण्याची शक्यता असते.
तरी परतीच्या वेळी आल्यानंतर कुठलेही ताप सदृश्य किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावे तसेच गावपातळीवर आशा स्वयंसेविके जवळ हिवताप चाचणी संबंधाने आर डी के. (जलद ताप सर्वेक्षण कीट) उपलब्ध आहे. तरी कुठलाही ताप कमी न समजता रक्ताची तपासणी करून घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी केले आहे.
स्थलांतरित मजूरांनो सावधान कुठलाही ताप घातक जीवघेणा ठरु शकतो. बाहेर कमवायला जाण्या अगोदर कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांना माहिती देवुन हिवताप प्रतिबंधात्मक औषधी डोज अवश्य घेवुन जा. हिवताप सदृश्य कुठलीही लक्षणे जसे ताप, सर्दी ,अंगदुखी, मळमळ, उलटी, जुलाब, ह्गवण व अतिसार इत्यादी लक्षणे दिसल्यास कुठल्याही भोंदुबाबा किंवा अप्रशिक्षित,पदवी नसलेल्या डॉक्टरांना न दाखवता जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करण्याचे आव्हान जिल्हा  आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले आहे.